Wednesday, June 11, 2008

shivdharma sanhita


shivdharma sanhita

शिवधर्माची प्राथमिक संहिता

मानवी जीवनात जे जे उदात्त,उत्तम,निकोप ,न्यायपूर्ण आणि मानवाच्या सर्व अंतःशक्ती विधायक मार्गाने फुलविनारे असे असते ते ते सर्व शिव स्वरुप असते;म्हनुनच शिवधर्म हे एका निर्मळ-निरामय समाजरचनेचे वास्तव रूप आहे.
शिवधर्म हा अतिप्राचीन असून वास्तवाचे ज्ञान आणि विज्ञानाचे भान या पायावर मानवाच्या सुंदर,समृद्ध आणि परस्परपुरक जगण्यासाठीची उन्नती ही या धर्माची अनादीकालापासूनची प्रेरणा राहिली आहे.
शिवधर्म हा अत्यंत प्राचीन धर्म असल्यामुले वंश, वर्ण , जात याबाबत या धर्माने आदिम कालापासून भेदाभेद केलेला नाही किंवा या बाबतीत उच्चनीचता, न्यून-अधिकता मानलेली नाही.मानवामध्ये निसर्गतः असनारया नर आणि मादी या स्तरावर समान असनारया शिव-शक्तीच्या रुपांना स्त्री आणि पुरुषाच्या स्वरूपाकड़े "जात" म्हणुन आदिमपासून पाहिले जाते.

शिवखंडात आदिम काळात निर्माण झालेली शिवसंस्कृती सिंधुसंस्कृती म्हणुन अभ्यासकानी मान्य केलि.ही संस्कृती संपूर्ण शिवखंडात पसरलेली होती.त्याचे पुरावे सर्वत्र उत्खननात सापड़ले आहेत.या संस्कृतीचा धर्म हा शिवधर्म होता.असा निकोप शिवधर्म इसवी सन पूर्व १७५० पर्यंत शिवखंडात पसरलेला होता. "मराठा सेवा संघ" या मध्य भारतात स्थापन झालेल्या शिवधर्मीय चलवलिने मानवाच्या सर्वांगीं उन्नतीसाठी पुन्हा एकदा शिवधर्माचे प्रकटन केले आहे. १२ जानेवारी २००५ सिंदखेड राजा येथे शिवधर्म पीठावरून शिवधर्माचे प्रकटन करण्यात आले.
१२ जानेवारी २००५ रोजी शिवधर्म प्रकटन उत्सवात तीन लाख बहुजनांनी शिवधर्मात प्रवेश करतांना घेतलेली प्रतिज्ञा!

मी (स्वतःचे नाव)(आईचे नाव)(वडिलांचे नाव)(आडनाव)
आज जिजाऊंच्या प्रेरणेने शिवधर्माच्या दिशेने वाटचाल करण्याची शपथ घेत आहे.येत्या तीन वर्षाट परिपुर्ण शिवधर्मी होण्याकरिता आवश्यक असलेली कठोर साधना करण्यासाठी मी आज कटिबद्ध होत आहे.मी शिवधर्माच्या आचारसंहितेचे तंतोतंत पालन करीन. शिवधर्माची भूमिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी मी अयुष्यभर कार्यरत राहीन,
अशी मी प्रतिज्ञा करतो/करते.
जय जिजाऊ!

दैनंदिन आचरण

१) झोपून उठल्यावर, प्रातःविधि आटोपल्यानंतर जिजाऊ वंदना म्हणावी.
२)वयोमाना नुसार योग्य तो व्यायाम करावा.
३) दिवसातून एकदा तरी कुटूम्बात सामूहिक जेवण करावे.
४) व्यसनापासून दूर रहावे, आचरण चांगले ठेवावे.
५) झोपन्यापूर्वी व्यक्तिगत अथवा सामूहिक जिजाऊ वंदना म्हणावी.
६) कुटूम्बातील सदस्यानी दररोज वाचन करावे किंवा समाजप्रबोधनाची तसेच ज्ञान-विज्ञानविषयक माहिती वाचून दाखवावी.
७) शिवधर्माशी संबंधित वा समाजाच्या सामाजिक कार्यक्रमाला निमंत्रनाशिवाय उपस्थित रहावे.
८) एकमेकांना भेटताना स्वतःचा परिचय स्वतः द्यावा व जय जिजाऊ या उद्घोषाने अभिवादन करावे.





साप्ताहिक तसेच नियमित


1) आठवड्यातून किमान एकदा "शिवारा"त एकत्र जमावे.तेथे महनीय वक्त्यांचे प्रबोधनपर विचार वा चर्चा यात सहभाग घ्यावा,परत जाण्यापुर्वी सामूहिक प्रार्थना म्हणावी (जिजाऊ वंदना किंवा जिजाऊ आरती)


२) आरोग्य रक्षणाकरीता आहार नियोजन करण्याची आवश्यकता म्हणून अल्पाहार,उपवास करण्यास हरकत नाही,इतर कोणत्याही धार्मिक कारणाने उपाशी राहू नये.


३)आपल्या आत्मसम्मानाला धक्का पोहोचेल, असे आणि अंधश्रद्धेवर आधारलेले असभ्य सन साजरे करू नये. बहुजनांचा सांस्कृतिक वारसा जपनारे सन अवडंबराशिवाय साजरे करावेत.







शिवार


शिवधर्माच्या प्रार्थना स्थलाचे नाव,शिवाराचा आराखडा तयार करण्यात आहे.जगभर सारखेच शिवार असावे, त्यासाठी खालीलप्रमाणे व्यवस्था करावी.



शिवार नियम


प्रत्येक शिवधर्मीयाचे प्रार्थनास्थल असावे, शिवधर्मानुसार चालनारया सर्व उपक्रमाचे ते केंद्र असेल.



स्वरुप


1) शिवधर्मीयांच्या गरजेनुसार सभागृह असावे. अवती-भवति मोकली जगा मोकले उद्यान असावे.


२) सभागृहाच्या विचारपीठाच्या बाजुस, जिजाऊंची भव्य प्रतिमा असावी.


३) सभागृहात दर्शनीभागी महामानवांची(स्त्री-पुरुष) तैलचित्रे असावीत.


४) ग्रंथालय असावे.


५) व्यायामशाला असावी.


६) आवश्यक पूर्ण वेल स्त्री-पुरुष शिवसेवक असावेत.








शिवाराचे उपयोग


१) आठवडयातुन एकदा नियमितपने एकत्र यावे.


२) महनीय वक्त्यांचे प्रबोधनपर भाषण,प्रासंगिक विषयावरील चर्चा यांचे आयोजन करावे.


३) गावातील समस्या, भांडनतंटे वा तशा प्रश्नावर चर्चा करून मार्ग काढने,कोर्ट कचेरयात जाण्याची वेल येवू नये.असा प्रयत्न करावा,


४) शिवधर्मीयांचे अन्य कार्यक्रम, लग्न, नामकरण वा तत्सम कार्यक्रम शक्यतो शिवारात व्हावेत.


५) शिवाराचे स्वरुप ज्ञानालया सारखे राहिल, असे उपक्रम राबवावेत.











tags-


shivdharma ,maratha seva sangh,sambhaji brigade,jijau brigade,jijau,jijamata.jijabai,shivaji,sambhaji,maratha,purushottam khedekar,dr.a.h.salunkhe,shivdharm